'सामना'वर बंदी घाला, अशी मागणी नव्हती

Meet and Greet with Shweta Shalini

Shweta Shalini, an entrepreneur

SED interactions


SED interactions

SED Specials

Daud Krishi Mahotsav march 2017

Biography


विदर्भ राज्य निर्मिति ची भूमिका अस्पष्ट बीजेपीच्या प्रदेश प्रवक्त्या

Mumbai Startup Fest'17


VIbgyor high fee Hike - Now, Magarpatta branch parents up in arms too

Sandip Kolhatkar

Mar 15, 2015
READ MORE

Irate parents cry foul as balewadi school hikes fees

Sandip Kolhatkar

Mar 08, 2015
READ MORE

कर्जमाफी करून मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा केला

Sep 21, 2017

-श्वेता शालिनी

कर्जमाफीच नव्हे तर देवेंद्र सरकार बळीराजाला कर्जमुक्त करेल- श्वेता शालिनी

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात चालणाऱ्या भाजप सरकारने सरसकट शेतीवरील कर्जमाफीचा निर्णय घेवून बळीराजाला सुखाचा धक्का दिला, भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी  दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला दिलासा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.जरी आज कर्जमाफी झाली तरी देवेंद्र सरकार ने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, शेतकर्यान आपला माल थेट ग्राहकांना पर्यंत पोहचवण्याची सोय अश्या अनेक शेतकरी हिताच्या निर्णयामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्याचा विश्वास वाटतो, असे श्वेता शालिनी महाराष्ट्र भाजप प्रवक्ता यांनी सांगितले.

ऑक्टोबर २०१४ ला जेंव्हा महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात भाजपला कौल दिला तेंव्हा राज्यातील परिस्थिती गंभीर होती. १५ वर्षाच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या शेतीविरोधी धोरणांमुळे शेतकरी डबघायीस आला होता, ७० हजार करोड पेक्षा जास्त रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामुळे शेतीला पाणी भेटत नव्हते, तर दुष्काळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती, त्यात लोडशेडिंग मुळे विजेचा अभाव आणि फूड प्रोसेसिंग ची सुविधा नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अश्या गंभीर परिस्तिथीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी राज्याची सत्ता हातात घेतली आणि पहिल्या दिवसा पासून बळीराजाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली. मुख्यमंत्र्यांनी सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जनसहभागातून जलयुक्त शिवाराची चळवळ उभारली, जलयुक्त शिवार अंतर्गत साडे अकरा हजार गावात पाच हजार कोटींची साडे तीन लाख कामे पूर्ण करून बारा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सिंचना खाली आणले. ५०० कोटींची तरतूद करून १ लाख ११ हजार पेक्षा अधिक शेततळे देवून, मागेल त्याला शेततळे हे नाव खऱ्या अर्थाने सार्थक केले.  जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेनात  मोठ्या प्रमाणात जनसहभाग होऊन पाणी वाचवण्याला महाराष्ट्रात एक चळवळीचे रूप प्राप्त झाले, मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला भरघोस प्रतिसाद देऊन, जनतेने देवेंद्र फडणवीस यांचा नेतृत्वात राज्याचा विकास होऊल हा विश्वास दर्शवला.  कॉंग्रेस राष्ट्रवादी ने १५ वर्षाच्या कार्यकाळात शेतकर्यांना थेट फक्त ६५०० कोटी रुपयांची मदत केली तर देवेंद्र सरकारने फक्त २.५ वर्षाच्या कार्यकाळात ११०९५ कोटी पेक्षा जास्त रुपयांची भरघोस मदत केली. पाणी, वीज आणि शेतमालाला भाव अश्या अनेक उपाय योजना करत असताना देवेंद्र सरकारने शेतकर्यांना दलालांच्या पाशातून मुक्त करण्याचे महत्वाचे पाऊले उचलले, यामुळे शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकून २ पैसे जास्त कमावू शकला.

इतक्या सगळ्या उपयायोजना होत असताना, जुन्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांवर झालेल्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आणि सरकार दोघेही बेचेन होते आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयाणी कर्जमाफीच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांसोबतच ११ करोड महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला आणि या निर्णयासाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेकडून मुख्यमंत्रांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. आज बळीराजा जुन्या बेड्या झुगारून नवीन उम्मीदीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लाऊन नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी उभा राहण्यास सज्ज आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून साकारणाऱ्या उन्नत शेती-समृद्ध  शेतकरी अभियाना अंतर्गत ३ लाख पेक्षा जास्त शेतकर्यान कृषी कौशल विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षित करण्यात येणार आहे तसेच इस्राइलच्या मोशाव पद्धतीने गट शेती करण्यासाठी आवश्यकती मदत सरकार कडून देण्यात येईल, इतकेच नव्हे तर शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून राज्यात ४ ठीकाणी इस्राइल तंत्रज्ञानाचे  सेंटर ऑफ एक्सलंस लवकरच उघडण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, शेतकऱ्यांचा कर्जमाफीमुळे वाढलेला उत्साह आणि शेतकऱ्यांचा मुख्यामंत्रांच्या नेतृत्व आणि योजनानवर विश्वास यामुळे नुसती कर्जमाफीच नव्हे तर लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होईल याचा विश्वास वाटतो.

 

 

 

कर्जमाफी करून मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा केला- श्वेता शालिनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात चालणाऱ्या भाजप सरकारने सरसकट शेतीवरील कर्जमाफीचा निर्णय घेवून बळीराजाला सुखाचा धक्का दिला. भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात भरडलेल्या बळीराजाला दिलासा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.जरी आज कर्जमाफी झाली तरी देवेंद्र सरकार ने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्याने आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची सोय अश्या अनेक शेतकरी हिताच्या निर्णयामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्याचा विश्वास वाटतो, असे महाराष्ट्र भाजप प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी सांगितले.

ऑक्टोबर २०१४ ला जेंव्हा महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात भाजपला कौल दिला तेंव्हा राज्यातील परिस्थिती गंभीर होती. १५ वर्षाच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारच्या शेतीविरोधी धोरणांमुळे शेतकरी डबघायीस आला होता, ७० हजार करोड पेक्षा जास्त रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामुळे शेतीला पाणी भेटत नव्हते, तर दुष्काळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती, त्यात लोडशेडिंग मुळे विजेचा अभाव आणि फूड प्रोसेसिंग ची सुविधा नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अश्या गंभीर परिस्तिथीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याची सत्ता हातात घेतली आणि पहिल्या दिवसा पासून बळीराजाला कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली. मुख्यमंत्र्यांनी सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जनसहभागातून जलयुक्त शिवाराची चळवळ उभारली, जलयुक्त शिवार अंतर्गत ११,५०० गावात पाच हजार कोटींची ३.लाख कामे पूर्ण करून बारा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र सिंचना खाली आणले. ५०० कोटींची तरतूद करून लाख ११ हजार पेक्षा अधिक शेततळे देवून, मागेल त्याला शेततळे या नावाचे खऱ्या अर्थाने सार्थक केले. जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेत मोठ्या प्रमाणात जनसहभाग होऊन पाणी वाचवण्याला महाराष्ट्रात एक चळवळीचे रूप प्राप्त झाले, मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला भरघोस प्रतिसाद देऊन, जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होइल हा विश्वास दर्शवला. कॉंग्रेस राष्ट्रवादी ने १५ वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना थेट फक्त ६५०० कोटी रुपयांची मदत केली तर देवेंद्र सरकारने फक्त २. वर्षाच्या कार्यकाळात ११०९५ कोटी पेक्षा जास्त रुपयांची भरघोस मदत केली. पाणी, वीज आणि शेतमालाला भाव अश्या अनेक उपाय योजना करत असताना देवेंद्र सरकारने शेतकऱ्यांना दलालांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली, यामुळे शेतकरी आपला माल थेट ग्राहकांना विकून २ पैसे जास्त कमावू शकला.

 इतक्या सगळ्या उपयायोजना होत असताना, जुन्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांवर झालेल्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आणि सरकार दोघेही बेचेन होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांसोबतच ११ करोड महाराष्ट्रातील जनतेला आनंद झाला आणि या निर्णयासाठी महाराष्ट्रातील सर्व जनतेकडून मुख्यमंत्रांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.

आज बळीराजा जुन्या बेड्या झुगारून नवीन उम्मीदीच्या वातावरणात मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लाऊन नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी उभा राहण्यास सज्ज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून साकारणाऱ्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियाना अंतर्गत ३ लाखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी कौशल विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षित करण्यात येणार आहे तसेच इस्राइलच्या मोशाव पद्धतीने गट शेती करण्यासाठी आवश्यक ती मदत सरकार कडून देण्यात येईल, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून राज्यात ४ ठीकाणी इस्राइल तंत्रज्ञानाचे सेंटर ऑफ एक्सलंस लवकरच उघडण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, शेतकऱ्यांचा कर्जमाफीमुळे वाढलेला उत्साह आणि शेतकऱ्यांचा मुख्यमंत्रांच्या नेतृत्व आणि योजनांवर विश्वास यामुळे नुसती कर्जमाफीच नव्हे तर लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होईल याचा विश्वास वाटतो. कर्जमाफी करून मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा केला – श्वेता शालिनी