इंडिया ग्लोबल समिट द्वारे अमेरिकेतील उद्योजकांना महाराष्ट्राशी जोडले जाईल
Sep 21, 2017
-श्वेता शालिनी
अमेरिकेमधील डेनवर शहरा मध्ये असलेली इंडिया ग्लोबल समिट अमेरिकेचे व्यवसाय, विद्यापीठे आणि तज्ञांना महाराष्ट्राशी जोडण्याचे कार्य करेल. माननीय श्री संभाजी पाटील निलंगेकर (कामगार आणि कौशल्य विकास मंत्री, महाराष्ट्र सरकार) सदर परिषदेचे प्रमुख वक्ते असतील. अधिक माहिती साठी पुढील संकेत स्थळास भेट दया- http://indiaglobal.org/about-us-indiaglobal-denver/
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्र्यांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्र राज्य जगभरातील गुतंवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. इंडिया ग्लोबल समिट महाराष्ट्र राज्य व परदेशी गुतंवणूकदारां मधील दरी कमी करण्यासाठी एक पुलाचे काम . माननीय श्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या परिषदेतील उपस्थितीमुळे जागतिक दर्जाची धोरणे व तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्यास मदत होईल.
इंडिया ग्लोबल हा जगभरातील भारतीयांसाठी एक आंतरराष्ट्रीय आधुनिक ‘थिंक-टँक’(विचार गट) आणि ‘डू-टँक’(कार्य गट) आहे. आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जे कृतीशील भारतीय काम करतात अशा व्यक्तींसाठी हा ‘थिंक-टँक’(विचार गट) स्थापन करण्यात आला आहे. डीजीटल क्रांती , प्रभावी शिक्षण प्रणालीची उभारणी , कौशल्य विकासाचे वातावरण निर्मिती,शहरीकरणातील प्रगती अथवा गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवाची उपलब्धता अश्या विविध मार्गांनी मार्गक्रमण करून भारत २०२० पर्यंत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहे असे इंडिया ग्लोबल च्या सहकारी श्वेता शालिनी (महिला उद्योजक आणि भाजपचे प्रवक्ते महाराष्ट्र) यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, आज विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत आणि प्रभावी नेतृत्वाखाली, राष्ट्र खरा विकास क्या असतो याचा अनुभव घेत आहे . समाजातील सर्व क्षेत्रांमध्ये वाढ आणि विकासावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. आणि परिवर्तनाच्या या शर्यती मध्ये तंत्रज्ञान एक प्रमुख भूमिका बजावत आहे.
इंडिया ग्लोबल ‘थिंक-टँक’(विचार गट) 'ब्रँड इंडिया' च्या क्षमतेला समजून आणि गेल्या वर्षीचा केंब्रिज, यूके येथिल 'इनोवेट फॉर इंडिया समिट' यशस्वी करण्याचा अनुभव पाठीशी घेवून यावर्षी एलेक्ट्स टेक्नोमिडिया (आशिया आणि मध्य-पूर्वेतील प्रमुख मीडिया आणि तंत्रज्ञान संशोधन संघटना)यांच्या भागीदारीने डेन्व्हर अमेरिकेत १०-११ जून, २०१७ दरम्यान 'इंडिया ग्लोबल समिट'चे आयोजन केले आहे. दोन दिवसांच्या परिषदेमध्ये भारत आणि जगभरातील विचारवंत, नीति रचनाकार, तज्ज्ञ आणि उद्योजक भारतच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून प्रशासन, शिक्षण, शहरी विकास, आरोग्य आणि आर्थिक विकासच्या विविध पैलूंवर चर्चा करतील.
डेन्व्हर इंडिया ग्लोबल समिटचे प्रमुख बिंदू :
- प्रभावी कौशल्य विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण
- बदलत्या औद्योगिक परिस्थितीसाठी कुशल मानव संसाधन
- आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पना
- राष्ट्र उभारण्यासाठी टिकाऊ शहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे
आपला आभारी/ धन्यवाद